आरोग्य सेवा
राज्यातील नागरिकांना पुरेशा, दर्जेदार आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र सरकार वचनबद्ध आहे. “निरोगी राज्ये, प्रगतीशील भारत” या नीती आयोगाच्या अहवालाच्या दुसऱ्या आवृत्तीनुसार आरोग्यविषयक एकंदर कामगिरीच्या बाबतीत केरळ आणि आंध्र प्रदेशसह महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी आहे.
सुदृढ नवी पिढी घडविण्यासाठी राज्य शासनाने महिला आणि बालकांसाठी विविध उपयुक्त योजना हाती घेतल्या आहेत. या योजनांबद्दल अधिक जाणून घ्या.
- महिला आणि बालकांसाठी योजना
- जिल्हानिहाय उपलब्ध डॉक्टर
- आरोग्याशी संबंधित सहाय्य आणि हेल्पलाइन क्रमांक
ठळक वैशिष्ट्ये
मोफत लसीकरण
गर्भधारणेपासून वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंतचे सर्व लसीकरण सरकारतर्फे मोफत केले जाते. या लसी सर्व सरकारी आरोग्य केंद्रांवर मोफत उपलब्ध आहेत.
पीडीएफ पहा![]()
फिट इंडिया अॅप
तुमच्या आरोग्याबाबत जाणून घ्या, बीएमआय तपासा, तुमची पावले मोजा, झोप पुरेशी होते का,ते बघा, उष्मांक सेवनाचा मागोवा घ्या, फिट इंडिया उपक्रमांमध्ये सहभागी व्हा, अनुरूप आहार योजना जाणून घ्या.
फिट इंडिया वेबसाइट फिट इंडिया मोबाइल अॅपआरोग्य विमा
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्य सरकारतर्फे राबवली जाणारी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील सेवा प्रदात्यांमार्फत सूचिबद्ध आजारांवर रोखरहित उपचार केले जातात.
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
१ एप्रिल, २०२० रोजी राज्यात एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली. राज्य आरोग्य विमा संस्थेतर्फे पात्र लाभार्थी कुटुंबांच्या वतीने दरवर्षी विमा कंपनीला प्रति कुटुंब रु. ७९७/- इतकी रक्कम त्रैमासिक विमा हप्ता म्हणून भरली जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण निधी प्राप्त होतो तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता होणाऱ्या खर्चाची विभागणी केंद्र आणि राज्य शासन यामध्ये ६०:४० या प्रमाणात करण्यात आली आहे.
आरोग्य सेतू संपर्क ट्रेसिंग नोंदणी
आरोग्य सेतू यंत्रणा संपर्क मागोवा तंत्राचा वापर करते. तुम्ही रोजची कामे करत असताना ज्यांच्या संपर्कात आला असाल त्या सर्व लोकांच्या तपशीलांची नोंद करते. तुमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी कोणीही कधीही कोवीडग्रस्त झाल्याचे आढळल्यास, तुम्हाला त्याबाबत तात्काळ माहिती दिली जाते आणि तुमच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्यवस्था केली जाते.
आरोग्य सेतू अॅपमध्ये नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे भारतात वापरात असलेला मोबाइल नंबर असणे गरजेचे आवश्यक आहे. अँड्रॉइड आवृत्ती 5 आणि त्यापेक्षा प्रगत, iOS आवृत्ती 10.3 आणि त्यापेक्षा प्रगत.
ईसंजीवनी नोंदणी
ईसंजीवनी नोंदणी ही दूरस्थ माध्यमातून आरोग्यसंबंधी सल्ला देणारी सेवा आहे. नागरिक-स्नेही असणाऱ्या या उत्कृष्ट सेवेची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
- रुग्ण नोंदणी
- टोकन
- रांगेचे व्यवस्थापन
- डॉक्टरांशी ऑडिओ-व्हिडिओ सल्लामसलत
- ई-प्रिस्क्रीप्शन
- एसएमएस/ईमेल सूचना
- राज्यातील डॉक्टरांतर्फे सेवा
- विनामूल्य सेवा
अंगणवाडी
बाल-कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी अंगणवाडी हा उपक्रम भारत सरकारतर्फे राबवला जातो. ‘अंगणातला निवारा’ असा ‘अंगणवाडी’ या शब्दाचा अर्थ इथे अभिप्रेत आहे. महाराष्ट्रात १०८००५ अंगणवाडी आणि लघु अंगणवाडी केंद्रे आहेत. तब्बल ४००० पेक्षा जास्त पर्यवेक्षक आणि सुमारे दोन लाख अंगणवाडी कामगार / मदतनीसांच्या सहाय्याने संपूर्ण राज्यभरात आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जातो आहे.
मानसिक आरोग्य

संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे दोन्ही पैलु सारखेच महत्त्वाचे आहेत. टेली मानस या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारने नागरिकांसाठी व्यापक मानसिक आरोग्यासंबंधी सेवा प्रदान केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही १४४१६ किंवा १८०० ८९१ ४४१६ या टोल फ्री क्रमांकांवरून सल्लागारांशी संपर्क साधू शकता.
जिल्हे
शहरे
निर्देशिका
शासकीय विभाग
महामंडळे
महाराष्ट्रातील वास्तव्य
आरोग्य सेवा
ज्येष्ठ नागरिक
युवा आणि महिला सक्षमीकरण
रोजगार संधी
परिचय
शाळा
महाविद्यालये आणि विद्यापीठे
व्यावसायिक अभ्यासक्रम
सेवा 
मूलभूत घटक
योजना
नाविन्याची कास
पुरक उद्योग
उद्योगाची पायाभरणी
भरभराट
समापन
समुद्रकिनारे
सरोवराकाठी
थंड हवेची ठिकाणे
वारसा स्थळे